Ad will apear here
Next
प्रदूषणमुक्त कोकणाचा संदेश देण्यासाठी रत्नागिरी ते गोवा सायकलवारी; १० जणांची ‘कोकण भरारी’


रत्नागिरी : रत्नागिरी ते गोवा हे ३१२ किलोमीटरचे अंतर तीन दिवसांत सायकलने यशस्वीरीत्या पार करून रत्नागिरीतील १० सायकलपटूंनी प्रदूषणमुक्त कोकणाचा संदेश सर्वांना दिला. वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायकलची ‘कोकण भरारी’ मोहीम नुकतीच पार पडली. 

गोव्याला जाण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहाने तयार असतात. परंतु सायकलने गोव्याला जाऊन ‘प्रदूषणमुक्त कोकण’ हा संदेश सर्वत्र पोहोचविण्याची कामगिरी रत्नागिरीतील १० सायकलपटूंनी केली आहे. त्यात डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशिगंधा पोंक्षे, कल्पेश चव्हाण, विनायक पावसकर, डॉ. नितीन सनगरे, मंगेश शिंदे, माधव काळे, सौ. निमा काळे, किरण चुंबळकर यांचा सहभाग होता. 

सागरी महामार्गावरून म्हणजेच कोकणच्या सागरकिनाऱ्यावरून तीन टप्प्यांत हा प्रवास पूर्ण झाला. पहिल्या दिवशी पावस, पूर्णगड, आडिवरे, धारतळे, नाटे, जैतापूर, कात्रादेवी मंदिर, जामसंडे असा प्रवास करून सायकलपटू देवगड येथे राहिले. हा त्यांचा प्रवास १०१.२ किलोमीटरचा होता. 

दुसऱ्या दिवशी देवगडहून निघून मिठबाव, मालवण, चिपी विमानतळ, परुळे या मार्गे सायकलपटू वेंगुर्ले येथे पोहोचले. हा प्रवास १०६.५ किलोमीटरचा होता. तिसऱ्या दिवशी वेंगुर्ल्यातून निघून मोचेमाड, शिरोडा मार्गे सर्व जण गोव्यात करमळीला पोहोचले. हा प्रवास १०४.३ किलोमीटरचा होता.

जिद्दी माउंटेनीअर्सच्या टीमने त्यांना सहकार्य केले. ‘हा प्रवास करताना कोकणचे वेगळे सौंदर्य अनुभवता आले आणि हे सौंदर्य टिकवण्यासाठीच आपण प्रदूषणमुक्ती केली पाहिजे. वाहनांचा अगदी आवश्यक असेल तिथेच वापर करून सायकलचा वापर वाढवला पाहिजे,’ असा संदेश डॉ. तोरल शिंदे यांनी या वेळी दिला. 

२०१८मध्ये वीरश्री ट्रस्टने रत्नागिरीत पहिल्या सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन केले होते. त्यानंतर सायकल क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबच्या सदस्यांनी वर्षभर रत्नागिरी आणि परिसरात सायकलस्वारी केली. डिसेंबर २०१९मध्ये दुसऱ्या सायक्लोथॉनलाही चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदूषणमुक्ती आणि आरोग्य यासाठी सायकलींच्या वापराबद्दलची जागृती वाढू लागल्याचे दिसू लागले. त्यानंतर रत्नागिरी ते गोवा सायकलवारीचा उपक्रम आखण्यात आला. विविध वयोगटांतील १० जण त्यात सहभागी झाले होते आणि त्यांनी तो उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZLLCI
Similar Posts
रत्नागिरीत एक डिसेंबरला वंध्यत्वासंदर्भात मोफत तपासणी शिबिर रत्नागिरी : रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अँड रिसर्च सेंटरच्या वतीने एक डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत धन्वंतरी रुग्णालयात वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन व मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
नर्सिंग कौशल्याद्वारे देशाच्या विकासात योगदान द्यावे रत्नागिरी : ‘विद्यार्थिदशा करिअर घडवणारी असून, नियमित व्यायाम, योगासने, योग्य वेळी नाश्ता, जेवण ही एक साखळी आहे. यातील कोणतीही गोष्ट अवेळी केल्याने प्रश्न उभे राहतात. त्यामुळे शिस्तीने वागावे, संगीत ऐकावे. त्यातून आपल्या क्षमतांचा विकास होतो. नर्सिंग कौशल्याद्वारे आपण देशाच्या विकासात योगदान द्यावे,’
देशासाठी पदक मिळवल्याचा आनंद अवर्णनीय : डॉ. निशिगंधा पोंक्षे रत्नागिरी : ‘कझाकस्तानमध्ये यंदा झालेल्या आशिया कप स्पर्धेत बायथले (Biathle) आणि ट्रायथले (Triathle) स्पर्धेत मी ५५ वर्षे गटात भाग घेतला. प्रचंड थंड पाण्यात पोहायचे, धावायचे, शूटिंग करायचे अशा प्रकारे क्षमतेचा कस लावणाऱ्या या वेगळ्या स्पर्धेत भारतासाठी मी दोन सुवर्णपदके मिळवू शकले. याचा आनंद अवर्णनीय आहे,’ अशा शब्दांत डॉ
महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया असल्यास लोकांच्या समस्या ममत्वाने सोडवू शकतात रत्नागिरी : ‘अनेक क्षेत्रांत महिलांना आरक्षण द्या, असे म्हटले जाते; पण गुणांना आरक्षणाची गरज नसते. गुण व कर्तृत्व असेल तर प्रतिकूलतेवर मात करून महिला गौरवास्पद कामगिरी करतात. त्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया विराजमान झाल्यास ममत्व, वात्सल्य, करुणेने त्या लोकांच्या समस्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language